न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- पांढ-या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतुन आरोपी आणि त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन अनोळखी इसम आले. फिर्यादीला तसेच फिर्यादीच्या कंपनीच्या सहकाऱ्यांना ‘मी येथील माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असुन माझ्या परवानगी शिवाय येथे कामगार कसे काय ठेवले’ असे म्हणाला. फिर्यादीला लाथाबुक्याने जबर मारहाण केल्याने फिर्यादीच्या डोक्याला, तोंडाला, कमरेला व पोटाला, पायाला मार लागला. तसेच आरोपीने फिर्यादीच्या हातातील १५००० रुपये किमतीचे टायटन कंपनीची घडयाळ व २५००० रुपयांची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावुन घेवुन फिर्यादीसह इतरांना दमदाटी, शिवीगाळ केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ५) रोजी दुपारी ४.१५ वाजता स्टार बाझार समोरील रोडवर, माऊली चौक, वाकड येथे घडला. फिर्यादी अनिकेत रविंद्र वाडीया (वय २४ वर्षे, शिवाजीनगर, पुणे) यांनी आरोपी बबलु जोगदंड व त्याच्यासोबत आणखी दोन ते तिन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ६४०/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.