न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- आनंदमार्ग प्रचारक संघ यांच्या वतीने तीन दिवसीय आनंदमार्ग योगा शिबिराचे आयोजन भोसरी येथे करण्यात आले आहे, अशी माहिती नवअतीत आनंद अवधूत, आचार्य सुरेश्वर आनंद अवधूत, बाबर सुनील शिवाजीराव, रमेश हिराजी रोकडे, सुबोध सिन्हा यांनी दिली.
भोसरी येथील रोशल गार्डन येथे ०७, ०८, आणि ०९ जुलै रोजी होणार आहे. हे शिबीर सर्वांना मोफत असून यावेळी उपस्थिताना नाष्टा व जेवणाची व्यवस्थाही निःशुल्क आहे.
या तीनदिवसीय आनंदमार्ग योगा शिबिरा आत्ममोक्षार्थम जगत् हितायच, आध्यात्मिक, सर्वोच्च आनंद आणि जागतिक कल्याण, मानव सेवा हिच ईश्वर सेवा अशीच आमची आस्था, आचार्य नभातितानन्द अवधूत हे सामाजिक, आध्यात्मिक विषयावर दर्शनशास्त्र, प्रकाश टाकतील. तसेच आसन, प्राणायाम, कौशिकी नृत्य, तांडव नृत्य, साधना, ध्यान, प्रभात फेरी, प्रभात संगीत, कथा किर्तन आदींचा समावेश आहे.
















