- नाखवा हॉटेल समोर पोलिसांची कारवाई; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनाने मुखांचे कर्करोग व इतर विकार होवुन शारीरीक हानी होऊ शकते. हे माहित असताना आरोपीने अॅक्टिवा मोपेडवर व राहत्या घरी एकुण १,४९,२२१ रुपये किंमतीचा प्रतिबंधीत सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ व सुगंधी सुपारी (गुटखा), हा माल बेकायदेशिरपणे विक्री करीता बाळगला.
गुन्हे शाखा युनिट ४ ने (दि. ६) रोजी दुपारी १:३० वाजता नाखवा हॉटेल समोरील मुंबई बेंगलोर हायवेच्या सर्व्हिस रोडच्या कडेला कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
वाकड पोलीस ठाण्यात ६४२ / २०२३ भा.दं.वि कलम ३२८, २६९, २७०, २७२, २७३,१८८ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रामकिशोर भवरुराम चौधरी (वय – ३६ वर्षे रा. डि. मार्ट जवळ, शिल्पलेखा सोसायटी, औंध, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.