- ओमप्रकाश बकोरिया यांची बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. ओमप्रकाश बकोरिया यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले असून सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरुवारी पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार गुरुवारी स्वीकारला. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी त्यांना पदभार दिला. सचिंद्र प्रताप सिंह यापूर्वी पशुसंवर्धन विभागात आयुक्तपदी कार्यरत होते.














