- करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव गुन्हेगारी टोळ्यांना लावला मोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव या तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
चिखली पोलीस ठाणे गुन्हा. रजि. नं. ३४६/ २०२३ भादंवि कलम ३०२, १२० (ब), आर्म अॅक्ट ३ (२५) (२७) महा.पो.अधि. कलम ३७ (१), १३५ च्या तपासामध्ये आरोपी करण रतन रोकडे, (टोळी प्रमुख) वय-२५ वर्षे, रा. जयमहाराष्ट्र चहा शेजारी, चिंतामणी नगर. आंबेडकर भवन जवळ, चिखली, पुणे, व इतर १२ यांच्या विरूध्द खून, खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी करणे. बेकायदेशीर जमाव जमवून खूनाचा प्रयत्न, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी, बेकायदेशीरपणे अग्निशस्त्रे जवळ बाळगणे, असे एकुण २४ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत दाखल आहेत.
सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ८९/२०२३ भादंवि ३९७, ३०७, ३२३, ४२७ महा.पो.का.क. ३७ (१) (३) सह १३५, क्रिमी लॉ. अ. अॅ. ३, ७ च्या तपासामध्ये आरोपी बाबा सैफन शेख, (टोळी प्रमुख) वय-२९ वर्षे, राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव, पुणे, व इतर ८ जणांविरुद्ध जबर दुखापत करून दरोडा, गंभीर दुखापत, दुखापत, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवुन गंभीर दुखापत, गाड्यांची तोडफोड करुन नुकसान करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे असे एकुण १० गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
तळेगांव MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ७७/२०२३ भादंवि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) ४ (२५) महा.पो.अधि. कलम ३७ (१), १३५ क्रि. लॉ. अ.अ.क. ७ च्या तपासामध्ये आरोपी अनिल जगन जाधव, (टोळी प्रमुख) वय-२३ वर्षे, रा. शिक्षक कॉलनी, वराळे, ता. मावळ, जि.पुणे, व इतर ६ यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दरोडा घालणे व बेकायदेशीरपणे अग्निशस्त्रे जवळ बाळगणे, असे एकुण ६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
वरील ३ टोळ्यामधील सर्व आरोपी हे संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहेत. सन २०२३ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १६८ आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे.
सदरची कारवाई ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, स्वप्ना गोरे. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे). काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०२ बाळासाहेब कोपनर सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली, शंकर अवताडे, वपोनि पी.सी.बी गुन्हे शाखा (अति. कार्य) ज्ञानेश्वर काटकर वपोनि चिखली पो.स्टे. श्री सुनिल टोणपे वपोनि सांगवी पो.स्टे. रणजिस सावंत वपोनि तळेगाव एम.आय.डी.सी पो.स्टे. तसेच अमंलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो. हवा व्यंकप्पा कारभारी ने पी.सी.बी. गुन्हे शाखा, म.पो.ना दुर्गा खाडे चिखली पो.स्टे, पो.ना सुहास डंगारे, सांगवी पो.स्टे, पो.शि. सचिन नांगरे तळेगाव एम.आय.डी.सी पो.स्टे यांचे पथकाने केली आहे.