- प्रभागातील अवैध धंद्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष; महापालिकेसमोर आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२३) :- अनधिकृत बांधकामे, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरच अनधिकृत ठेले, फुटपाथसह पूर्ण रस्ता गिळंकृत, सोसायट्यांच्या कंपाउंड वॉल वर झालेली अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यावर सोडण्यात आलेले सांडपाणी यामुळे सुरक्षा आणि आरोग्य याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. याच परिसरातील झोपडपट्टीमध्ये चालणारे अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि देहविक्री याची वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने स्पाईन रोड, कृष्णानगर येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. त्रस्त झालेल्या रहिवाशांनी गुरूवारी (दि.६) महापालिकेसमोर आंदोलन केले.
कृष्णानगर स्पाईन रोड लगत सेक्टर क्रमांक २० मध्ये प्राधिकरणाने विकसित केलेल्या प्लॉट नं २१ ते पुढे २० सोसायटी मधील साधारण ७ हजार लोकसंख्या आहे. हे नागरिक गेल्या १४ वर्षांपासून या परिसरातील सोसायट्यामध्ये राहत आहेत. सोसायटीच्या बाजूस प्राधिकरणाने आरक्षित केलेले प्लॉटमध्ये बस टर्मिनल, मेट्रो स्टेशन, गार्डन, पार्किंग झाले आहे. वास्तविकता, आरक्षित प्लॉट्स हे सोसायट्या तयार होण्याआधी रिकाम्या स्तिथीत होते. परंतु सदर आरक्षित प्लॉट्स मध्ये दिवसेंदिवस अनधिकृत झोपड्या व बांधकामे होऊन त्यांचे एका मोठ्या झोपडपट्टीत रूपांतर झाले आहे. तसेच सध्यस्थित अनधिकृत झोपड्या व बांधकामे रस्त्यांवर आलेली आहेत.
सोसायट्यांच्या कंपाउंड वॉल वर झालेली अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यावर सोडण्यात आलेले सांडपाणी यामुळे सुरक्षा आणि आरोग्य याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. याच परिसरातील झोपडपट्टीमध्ये चालणारे अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि देहविक्री याची वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने स्पाईन रोड, कृष्णानगर येथील सर्व रहिवाशी त्रस्त झाले आहेत. तसेच मुख्य चौकातील कामगार नाक्यामुळे या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अशा विविध प्रश्नांची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.














