- पिंपरी चिंचवड पोलीसांकडुन ‘मोका’ अंतर्गत कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 09 जुलै 2023) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चाकणच्या लहू चव्हाण आणि पिंपरीच्या चांड्या पवार या दोन गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीसांकडुन मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईत चाकण पोलीस ठाणे, गुन्हा. रजि. नं. ३६६/२०२३ भादंवि कलम ३९२, ३४ चे तपासामध्ये आरोपी गणेश उर्फ लहु रामभाऊ चव्हाण, (टोळी प्रमुख) वय २८ वर्षे, रा. मराठी शाळेजवळ, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे. व इतर ०२ यांच्याविरूध्द दरोडा घालणे, जबरी चोरी, चोरी, विश्वासघात करून चोरी करणे, विनापरवाना घातक हत्यार जवळ बाळगणे, असे एकुण १० गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
दुसर्या कारवाईत पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४८५/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३९५, ३९७, ५०६, ४२७, १२०(ब), २०१, आर्म अॅक्ट ४ (२७), ७(२५) महा.पो.का. ३७ (१) (३) सह १३५, क्रि. लॉ. अॅ.अॅ. ७ चे तपासामध्ये आरोपी नामे (१) अतुल ऊर्फ चांड्या अविनाश पवार, (टोळी प्रमुख) वय ३० वर्षे, रा.- व्हि. / ६, मिलिंदनगर, पिंपरी, पुणे, व इतर १५ यांच्याविरुध्द खुन करण्याचे उद्देशाने अहरण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, कट रचणे, पुरावा नष्ठ करणे, दरोडा घालणे, दरोडयाची तयारी करणे, जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सदोष मनुष्य वध करणे, विनयभंग करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, वाहने तोडफोड, गैरकायद्याची मंडळी जमविणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे व अग्नि शस्त्रे जवळ बाळगणे असे एकुण २१ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड व पुणे पोलीस आयुक्तालयचे हद्दित दाखल आहेत.
या दोन्ही टोळ्यामधील सर्व आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून नमूद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, स्वप्ना गोरे. पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, यांचे मार्गदर्शनाखाली, शंकर आवताडे, व.पो.नि. पी.सी.बी. गुन्हे शाखा (अति. कार्य), वैभव शिंगारे, व.पो. नि. चाकण पोलीस ठाणे, श्री. राम राजमाने, व.पो. नि. पिंपरी पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पो.ना. नितीन गुंजाळ, चाकण पोलीस ठाणे, पो.ना. ओंकार बंड, पिंपरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
सन २०२३ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १६ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १८७ आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत कारवाई पोलीसांकडुन करण्यात आली आहे.