न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जुलै २०२३) :- प्रशासकीय कामासाठी फिर्यादी शाळेत आले होते. त्यावेळी आरोपी हा मुख्याध्यापकांशी उद्धटपणे बोलून वाद घालीत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना ‘तु मुख्याध्यापकाशी निट बोल’, असे समजावले.
दरम्यान आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच ‘विनाकारण नाक खुपसू नको, तसाही तुला जास्त माज आला आहे; तु बाहेर ये बघुन घेतो’ असे म्हणत फिर्यादीला धमकी देत आरोपी निघुन गेला. ही घटना (दि. ८) रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास श्री शिवछत्रपती प्राथमिक विदयालय, मुख्याध्यापक कार्यालयात मोरे वस्ती, चिखली येथे घडली.
फिर्यादी अविनाश वसंत पवार (रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी आरोपी मधुकर दशरथ काळे (रा. रावेत) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ४२६/२०२३ भादवि कलम ५०४, ५०६ अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती कायदा २०१५ चे कलम ३ चे पोटकलम (१) (r) १(s) नुसार आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.