न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल हद्दीत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार (दि. ९ ते १०) ऑल आऊट ऑपरेशन कोम्बींग व नाकाबंदी नेमण्यात आली होती. या कारवाई दरम्यान नाकाबंदी संशयीत वाहने १८७८ चेक केले. रेकॉर्डवरील ६०५ आरोपी चेक केले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे १८३ वाहनांवर कारवाई करुन ३,२६,८०० रुपये दंड वसुल केला आहे. नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पुढील कारवाई केली.
हॉटेल लॉज १०३ चेकिंग, संशयीत इसम ७० चेक केले. हिस्ट्रीसिटर ६० चेक केले. ५७ अटक पाहिजे आरोपी, फरारी ३ आरोपी, संशयीत ताब्यात घेतलेली १५ वाहने, ११ एन. बी. डब्ल्यु वॉरंट, बी. डब्ल्यु वॉरंटची ५ बजावणी, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ प्रमाणे ७ कारवाई, २ आर्म अॅक्ट कारवाई, महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत ३ याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
कारवाईत पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील परिमंडळ -०१, पोलीस उप-आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे परिमंडळ -०२ सर्व सहा. पोलीस आयुक्त तसेच सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी व अमलदार, सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार असे एकुण ७९ पोलीस अधिकारी ४२२ पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.