- वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२३) :- माथाडीच्या नावाखाली व्यवसायीक व कामगार यांच्यात दहशत माजवुन आर्थिक लुटमार करणा-या प्रत्येक इसमांवर कडक कारवाई झाली पाहीजे, याबाबत शासनाने वेळोवेळी सूचना पारीत केल्या आहेत. या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी शहर हद्दीत दोन कारवाया केल्या आहेत. सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
पहिली कारवाईत (दि. ५) रोजी रात्री. ७०० च्या सुमारास स्टार बाझार समोर, माऊली चौक, वाकड येथे फिर्यादी अनिकेत रविंद्र वाडीया हे त्यांच्या मालकीच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीज सव्हिसेस प्रा.लि. चे असिस्टंट मार्केटींग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे असे प्रमोशनल अॅक्टीव्हीटी करत असताना तेथे पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीतून बबलू जोगदंड व त्याच्यासोबत आलेल्या आणखी दोन ते तीन अनोळखी इसमांनी (दि. ५) रोजी रात्री. ७०० च्या सुमारास स्टार बाझार समोर, माऊली चौक, वाकड येथे फिर्यादी अनिकेत रविंद्र वाडीया हे त्यांच्या मालकीच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीज सव्हिसेस प्रा.लि. येथे असिस्टंट मार्केटींग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे प्रमोशनल अॅक्टीव्हीटी करत असताना ” मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असून माझ्या परवानगी शिवाय येथे कामगार कस काय ठेवले? काम कसे काय करत आहात? असे बोलून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हातातील टायटन कंपनीचे घडयाळ व हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेवून आरोपी निघुन गेले. मारहाणीमध्ये फिर्यादीच्या डोक्याला, तोंडाला पोटाला, कंबरेला, पायाला मार लागला. वाकड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ६४०/२०२३ भादविक ३९४,५०४, ५०६, ३४ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाच्या तपासात सी.सी.टी.व्ही फुटेजनुसार पाच जणांनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हयात भा.द.वि. कलम ३९५ चा अंतर्भाव करण्यात आला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकाचे सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांना आरोपी बबलू जोगदंड व त्याच्या साथीदारांचा शोध घेवून ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाचे दोन वेगवेगळे पथके तयार केली. आरोपींचा शोध घेत असताना (दि.६) रोजी बबलू जोगदंड हा वाशी नवी मुंबई येथे त्याच्या साथीदारांसोबत लपुन बसला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. वाशी, नवी मुंबई येथे जावुन सापळा लावून कारवाई करून बबुल जोगदंड व त्याचा साथीदार समीर शेख यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
रमाकांत ऊर्फ बबलु राजेंद जोगदंड (वय ३० वर्षे रा. मंगलनगर, वाकड), समीर ऊर्फ बबलू नझीर शेख (वय ३३ वर्षे रा. माँ गंगा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), मयुर बाळासाहेब सरोदे (वय २३ वर्षे रा. समीर भुजबळ चौक, पुनावळे), करण सदाफळ चव्हाण (वय २४ वर्ष, रा. पिरबाबा मंदीराजवळ पुनावळे गावठाण) अशा चार जणांना पोलिसानी अटक केली असून (दि. ११) रोजीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी रिमांड प्राप्त आहे. या गुन्हयातील मुख्य आरोपी रमाकांत ऊर्फ बबलू राजेंद्र जोगदंड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. तो माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार या युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे.
दुसऱ्या कारवाईत (दि. ४)रोजी ज्योतीबानगर, काळेवाडी येथे तीन ट्रक चालकांना सफारी कार आडवी लावुन माथाडी जनरल कामगार युनियन ट्रान्सपोर्टचा पिंपरी चिंचवड शहर सचिव आहे, असे सांगत चालकांना ‘तुम्ही माझ्या एरियामधून मला पैसे न देता कसा काय माल घेवून जाणार? असे म्हणून प्रत्येकी १० हजार रूपये खंडणी मागितली व लोखंडी रॉडने ट्रकच्या आरश्याची काच फोडून २००० रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या सुरेश बाबुराव बनसोडे (वय ३७ वर्षे रा. आकाश गंगा सोसायटी समोर. रहाटणी) यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यास अटक करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो पोलीस उप आयुक्त परि-२, मा. श्री. डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, सपोनि अनिल लोहार, पोउपनि मक्सुद मणेर, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफो बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, पोना प्रशांत गिलबीले, पोना, अतिक शेख, पोशि, अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि कोर्तेय खराडे, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर कोतवाल, पोशि हेमंत गुत्तीकोंडा, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयतर्फे आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व उदयोजकांना/ व्यावसायीकांना आवाहन करण्यात येते कि, कोणीही माथाडी संघटनेचे नावाने धाकदपटशहा केल्यास अथवा रोख रक्कमेच्या स्वरूपात खंडणी मागीतल्यास निर्भयपणे तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास (संपर्क क्र. (०२०) २७३५२५००, ११२) या क्रमांकावर किंवा जवळचे पोलीस ठाण्यास संपर्क करावा जेणेकरुन संबंधीतावर ठोस कायदेशीर कारवाई करता येईल. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्व उदयोगधंदे भयमुक्त आणि शाश्वत वातावरणात सुरू राहण्यास हवेत.