न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- कोकण खेड युवाशक्ती या सामाजिक संस्थेची नवनिर्वाचित कार्यकारणी २०२३-२०२४ नुकतीच जाहीर करण्यात आली. रुपेश मोरे यांची कोकण खेड युवाशक्तीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
नवनियुक्ती कार्यकारिणीचा सत्कार चिखलीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत झाला. संस्थेच्या उपाध्यक्षपदी संदीप जाधव व मंगेश घाग तसेच सचिव प्रा संदीप सकपाळ, सहसचिव समीर चव्हाण, कार्याध्यक्ष संतोष कदम व राहुल ढेबे, खजिनदार नंदकुमार महाडिक व महेश गोरे तसेच उत्सव कमिटी अध्यक्ष कैलास मोरे अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी अठरा गाव मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम, कॅप्टन श्रीपत कदम, गजानन मोरे, दत्तात्रय सकपाळ, पांडुरंग कदम, युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप सकपाळ यांनी केले तर आभार सूरज उत्तेकर यांनी मानले.














