न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विज्ञान व तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास विभागाकडून रवि नांगरे यांची काँग्रेसच्या कौशल्य विकास विभागाच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सुरेश यादव यांनी त्यांना निवडीचे नुकतेच नियुक्तीपत्र दिले. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, नरेंद्र बनसोडे, विशाल सरोदे, विजय ओहाळ, गणेश नांगरे आदी उपस्थित होते.














