न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२३) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता गुरुवारी (दि. १३) रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने देण्यात आली आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघी, व्हीएसएनएल कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.














