- पिंपळे सौदागरमध्ये ‘संस्कृत-सम्भाषण-शिबिरमं’ संवाद शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात ‘संस्कृत भारती’ पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या माध्यमातून संस्कृत-सम्भाषण-शिबिरमं या संवाद शिबिराचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात अनेक अभ्यासकांनी संस्कृत भाषा आणि संभाषणाची माहिती देत संस्कृत भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी परिसरातील सोसायटी वर्गाचा उस्फुर्त सहभाग होता. अनेकांनी संस्कृत भाषेचे धडे गिरवले.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, संस्कृत भारती’ चे पिंपरी चिंचवड शिक्षणप्रमुख चिन्मय फडके, संयोजिका रोहिणी केळापुरे, संभाषण शिक्षिका कीर्ती मुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय खिरीड, सचिन जोशी, मयूर गाडे, विजेंद्र साह, साधना पाटील, भारती साळुंखे, रेणू मिश्रा, गायत्री कुलकर्णी, सुनिता कुलकर्णी, नूतन देशपांडे आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, आज कोट-पँट घालणारेही संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण जगातील सर्व ज्ञान केवळ वेदांमध्ये आहे आणि वेद संस्कृत भाषेत आहेत. आज परदेशातही संस्कृत विद्यापीठे सुरू होत आहेत, हे संस्कृतचे मोठेपण आहे. प्रत्येक शास्त्र केवळ संस्कृतमध्ये आहे. यासोबतच गणित आणि अर्थशास्त्र या विषयांचे स्रोतही संस्कृतमध्ये आहेत, त्यामुळे संस्कृत ही जगातील सर्वोत्तम आणि शाश्वत भाषा आहे आणि जगातील सर्व भाषांवर संस्कृतचा प्रभाव आहे.
–














