- अति उत्कृष्ट पोलीस सेवा पदक मिळाल्याबद्दल गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून “अति उत्कृष्ट पोलीस सेवा पदक” मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक गौरव कुंभार यांचा फुगेवाडी-दापोडी शिवसेना शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मा. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते गौरव कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गौरव कुंभार यांना मिळालेला हा सन्मान फुगेवाडी-दापोडी परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे उपस्थितांनी सांगितले. तसेच त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजप नेते सदगुरू कदम, शिवसेना विभागप्रमुख प्रमोद गायकवाड, विभागप्रमुख अविनाश जाधव, उपविभागप्रमुख योगेश बहिरट, उपविभाग प्रमुख राहुल जाधव, प्रभागप्रमुख फिरोज शेख, कोकण महासंघाचे अध्यक्ष गजानन मोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.


















