न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२३) :- जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या गुरूवारी श्री क्षेत्र चिंचवडगावात येणार आहे. याठिकाणी महासाधू मोरया गोसावी व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पंचारती होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवड देवस्थान ट्रस्ट व सकल ग्रामस्थ चिंचवडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू आहे. आज (बुधवार) पालखी सोहळा पिंपरीगावात मुक्कामासाठी असणार आहे. गुरूवारी सकाळी सात वाजता पालखी सोहळा पिंपरीहून इंगल हॉटेल लिंक रोडपासून मोरया हॉस्पिटल येथे विसाव्यासाठी एक तासभर थांबणार आहे.
या ठिकाणी महासाधू मोरया गोसावी व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पंचारती होणार आहे, अशी माहिती श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवड देवस्थान ट्रस्ट व सकल ग्रामस्थ चिंचवडगाव यांच्या वतीने देण्यात आली आहे.














