न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित (शाखा: चिखली-मोशी) च्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक भान आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी चिखली, एमआयडीसी भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यासह संबंधित उपायुक्त (DCP) कार्यालयाला भेट देऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान केला.
नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास तत्पर राहणाऱ्या पोलीस बांधवांच्या निष्काम सेवेबद्दल (Selfless Service) कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ‘रिअल हिरोज’ (Real Heroes) सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महासंघाचे पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली-मोशी शाखेच्या कार्यकारिणी कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यामध्ये श्री. आशिष सातकर, श्री. विजय महाजन, ॲड. नितीन शिला, श्री. लक्ष्मण इंदोरे, श्री. विनायक जगताप, सौ. आशा वाबळे, श्री. सुभाष गारगोटे, श्री. राजेंद्र माने, डॉ. विनोद भेलोसे, श्री. स्वप्निल झांबरे, श्री. राहुल मोकाशी, श्री. राजेंद्र शिंदे आणि डॉ. माणिक गावडे यांचा समावेश होता.
पोलीस प्रशासनाने महासंघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून नागरिकांच्या सहकार्याने परिसरात अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा विश्वास व्यक्त केला. महासंघाच्या या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

















