न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने रविवारी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल साळुंके, वाकड विभाग प्रमुख नवनाथ कुदळे, वाल्हेकरवाडी विभाग प्रमुख वैजनाथ माळी व पदाधिकारी उपस्थित होते.
चिंचवडे लॉन्स येथे सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्यास अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, उपाध्यक्ष एकनाथ खेडकर, खा. श्रीरंग बारणे, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास माळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माळी यांनी केले आहे.