पिंपळे सौदागरमध्ये रस्ता खचला; जीवितहानी नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॅान रोडवरील छत्रपती चौकात नवीन बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी भूस्सखलन होवुन रस्ता खचला. रस्त्यात असलेली पाणी पुरवठा लाईन व स्ट्रोम वॅाटर लाईन देखील तुटली आहे.
ही घटना आज गुरुवारी (दि. २०) पहाटेच्या वेळी घडली. कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पहाटे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी व परिसरातील सोसायटीमधील नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली.
घटनास्थळी मनपा अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासन हजर झाले. पोलीस व मनपा विभाग यांना बॅरीकेटीग केले आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे पाईपलाईन व रस्ता दुरूस्ती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्मार्ट सिटी म्हणून पिंपळे सौदागरमध्ये मोठी कामे झाली आहेत. त्यातच अशी घटना घडल्यामुळे स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.














