- अन्यथा दिलायं कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :- सध्या सुरु आलेल्या पावसाळयाच्या पार्श्वभुमीवर सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांना व क्लिनिक पॅथालॉजी लॅबसाठी महापालिकेने आदेश काढला आहे. किटकजन्य व जलजन्य आजाराचा रुग्ण आढळुन आल्यास/ दाखल झाल्यास त्याची परिपुर्ण माहिती (दवाखान्याचे नाव, रुग्णाचे नाव, वय पत्ता, उपचार घेतल्याची तारीख, रिर्पार्ट तारीख) त्वरीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागास कळवावी.
महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारित) या कायदयानुसार सर्व अहवाल विहित मुदतीत कळविणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कॉलरा (पटकी), जापनीज इन्सेफलायटीस, डेंग्यु, संसर्गजन्य काविळ, गॅस्ट्रोइंट्रायटीस, लेप्टोस्पायरोसिस, मलेरीया, चिकुनगुनिया, शासन अधिसुचित करेल असे आजार इत्यादी आजारांचा समावेश आहे. शहरातील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायीक व क्लिनीक पॅथालॉजी लॅबरुग्णालयामध्ये रुग्ण आढळुन आल्यास/दाखल झाल्यास त्याची वरीलप्रमाणे परिपुर्ण माहिती खालील संबधित झोनल रुग्णालयाच्या ई-मेल आयडीवर व त्यानंतर लेखी स्वरुपात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबधित झोनल रुग्णालयास कळवावी.
वेळेत माहिती देण्यास, टाळाटाळ झाल्यास किंवा दुर्लक्षित झाल्यास महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम २०२१ सुधारित तसेच साथरोग अधिनियम १८९७ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र असाल, असे निवेदन महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
सोबत झोनल रुग्णालय प्रमुख यांचे संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी :-
अ.क्र रुग्णालयाचे नाव झोनल रुग्णालय प्रमुख नाव व
संपर्क क्रमांक ई-मेल आयडी
१
कै. ह.भ.प प्रभाकर
मल्हारव कुटे रुग्णालय,
आकुर्डी
डॉ.बाळासाहेब होडगर
(मो.क्र.9922501316) [email protected]
२ तालेरा रुग्णालय डॉ.संगिता तिरुमणी
(मो.क्र.9922501301) [email protected]
३ वाय.सी.एम.रुग्णालय
(कु.क.विभाग)
डॉ.शैलजा भावसार
(मो.क्र.9922501325) [email protected]
४ जिजामाता रुग्णालय डॉ.सुनिता साळवे
(मो.क्र.9881161255) [email protected]
५ भोसरी रुग्णालय डॉ.ऋतुजा लोखंडे (मो.क्र.
8888844246) [email protected]
६ यमुनानगर रुग्णालय डॉ . अलवी (9823202706) [email protected]
n
७ थेरगांव रुग्णालय डॉ.राजेंद्र फिरके
(मो.क्र.9922501302) [email protected]
८ सांगवी रुग्णालय डॉ.तृप्ती सागळे
(मो.क्र.8888844208) [email protected]