- या तारखेपर्यंत भरू शकता अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२३) :-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची मुदत उद्या २८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अर्ज सादर करताना द्यावयाच्या कागदपत्रांसाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे या योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी महापालिकेने १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे योजना राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पाकरिता अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यासाठी (दि. २८) पर्यंत जाहीर प्रकटनाद्वारे मुदत देण्यात आलेली होती. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला इ. कागदपत्रे मिळण्यासाठी नागरीकांना विलंब लागत होता. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.














