- या मार्गे जाता येईल हिंजवडीकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२३) :- मारुंजी वाय जंक्शन, भुमकर चौक, काळाखडक या ठिकाणावरून हिंजवडी आय.टी. पार्कमध्ये जाणा-या व येणा-या वाहनांची संख्या वाढली आहे.
सध्या मेट्रोचे काम सुरु असल्याने व मारुजी वाय जंक्शन या ठिकाणी हेवी व्हेइकल ला यु टर्न घेण्यासाठी रस्ता अपुरा पडत असल्याने वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने वाकड वाहतुक विभागाअंतर्गत वाहतुक बदलाबाबतची अधिसूचना काढली आहे.
उद्या मंगळवारी (दि. ८) पासून मारुंजी वाय जंक्शन येथील उजवीकडील यु टर्न बंद करुन लक्ष्मी चौकाकडे जाणारी वाहतुक कस्तुरी चौक मार्गे विनोदे कॉर्नर येथून इच्छित स्थळी जाईल. मारुंजी वाय जंक्शन ते कस्तुरी चौक एकेरी वाहतुक करण्यात आली आहे.
कस्तुरी चौकाकडुन मारुंजी वाय जंक्शनकडे येणारी वाहतुक बंद करून ती कस्तुरी चौकातून विनोदे कॉर्नरमार्गे मारुंजी वाय जंक्शनकडे वळविण्यात आली आहे.














