न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात प्रथमच सहायक आयुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी सतीश माने यांची जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण हे जनसंपर्क विभागाचे काम पाहत होते.
पोलीस आणि जनता यांच्यात समन्वय राखण्याकरिता सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश महासंचालक कार्यालयाकडून प्रमुखांना देण्यात आले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेचा पदभार असलेले सहायक आयुक्त सतीश माने यांना जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.














