न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 13 ऑगस्ट 2023) :- ‘आजादी का अमृत महोत्सव, यानिमित्त पिंपरी विधानसभा प्रभाग क्रमांक दहामध्ये तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
दरम्यान शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर, दत्तनगर, मोरवाडी या मार्गावर रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.
नागरिकांकडून जागोजागी पुष्पवृष्टी करून बाईक रॅलीचे स्वागत करण्यात आले. या रॅलीची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, सुप्रिया चांदगुडे म, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी परिश्रम घेतले.