- वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड परीसरात जबरी चोऱ्यामध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी, अधिकारी यांना वाहन चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याचे तयारीत असलेले इसम, चैन स्नॅचिंग सर्व प्रकारच्या गुन्हयांना प्रतिबंध होण्याकरीता सतर्क पेट्रोलिंग व विविध उपाययोजना करुन गुन्ह्यांना प्रतिबंध व गुन्हे उघड करण्याबाबत आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे घडणारी वेळ व रस्त्यावरील संशयित वाहने चेक करणे, संशयितांना ताब्यात घेवुन चौकशी करणे, तसेच सतर्कतेने पेट्रोलींग करुन गुन्हयांना आळा घालणे व आरोपींना पकडुन गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वाकड पोलिसांच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी (दि. १७) रोजी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीला आणि मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील अंमलदार सपोफी राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोना अतिक शेख व पोशि रमेश खेडकर हे वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे वाकड पोलीस ठाण्याचं हद्दीत रात्री ३.०० च्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबऱ्याकडून डीमार्ट थेरगावच्या बाजुस असलेल्या जगताप कॉलनीतील रोडवर साहिल एलिगन्स सोसायटीसमोर अंधारामध्ये ४ ते ५ इसम थांबले असुन त्यांच्याकडे कोणती तरी हत्यारे असुन ते संशयास्पद वाटत आहेत’ अशी गोपनीय बातमी मिळाली. पोलीस पथकाने त्या ठिकाणी आरोपी दबा धरुन बसलेले दिसुन आले. त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते पळण्याचा प्रयत्न करीत असतानाच तपास पथकातील पोलिसांनी सापळा रचुन पाच इसमांपैकी ४ इसमांना ताब्यात घेतले. त्यातील एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला.
शाम हरी गाडवे (वय २१ वर्षे, रा. दळवीनगर, पांढरकरचाळ, आकुर्डी; मुळ रा. शेळगाव-तांदळवाडी, ता. करमाळा, जि. सोलापुर), अतिष भारत सिरसाट (वय १९ वर्षे, रा. लिंकरोड पत्राशेड, म्हसोबा सोसायटी, चिंचवड), नवनाथ दिगंबर साठे (वय ३५ वर्षे, रा. कैलास कॉलनी, थेरगाव; मुळ रा. खुडुस, ता. माळशिरस, जि. सोलापुर), शुभम सिद्राम कांबळे (वय १९ वर्षे, रा. पत्राशेड झोपडपट्टी, भाटनगर, पिंपरी, मुळ रा. कामटी, ता. मोहोळ, जि. सोलापुर) असे असुन पळून गेलेल्या आरोपीचे नाव करण ऊर्फ कल्ला टाक (रा. धोबीघाट, पत्राशेड, पिंपरी) असे निष्पन्न झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या ताब्यातून ०३ लोखंडी कोयते, मिरची पावडर, एक मोबाईल फोन, एक तीन चाकी अपे टेम्पो व अॅक्सेस कंपनीची मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी करता ते सर्व मिळुन वाकड परिसरामध्ये असलेल्या बंद दुकाने किंवा मॉल, डिमार्ट तसेच बिल्डींगचे चालु असलेल्या कामाच्या ठिकाणाचे साहीत्य व इतर किंमती वस्तु तेथील वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवुन लुटणार असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ७९८/२०२३, भा.दं.वि. कलम ३९९. ४०२ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन अटक आरोपीतांना दिनांक २०/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त आहे. त्यांचेकडुन आणखी काही गुन्हे केले आहेत का? तसेच कोठे गंभीर गुन्हा केला आहे का? याचा पोलीस कोठडीदरम्यान अधिक तपास करीत आहोत.
तसेच दुसऱ्या कारवाईत तपास पथकाचे पोलीस गस्त घालीत असताना नीलकमल हॉटेल, मुंबई-पुणे हायवे सर्व्हिस रोड, ताथवडे येथे सकाळी १०.०० च्या सुमारास एका बाईकवरील दोन इसम हे एकाचा मोबाईल चोरुन घेऊन पळुन जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्या इसमांचा पाठलाग केला व जबरी चोरी करणाऱ्या इसमांना चौधरी पार्क, वाकड येथे शिताफिने पकडले.
प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव (वय ३० वर्षे), महेश सुरेश किर्तीकुडाव (वय २७ वर्षे, दोघे रा. बौध्द वस्ती, कोडोली ता. जि. सातारा) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडुन चोरी केलेला मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी (एमएच ११ डीसी ४८११) हस्तगत केले आहे. आरोपी प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव याच्यावर सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७७/२०१३ कलम ३९४.३४ भा.दं.वि., गु.र.नं. ६०/२०१५ कलम ४५२, ३२३, ५०४,४२७ भा.दं.वि., गु.र.नं. १६१/२०१५ कलम ३९४, ३४ भा.दं.वि. अन्वये तसेच ६५ ई मदाका. अन्वये ६ केसेस दाखल असुन इसमावर तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरुन कलम ३९२, ३४ भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नमुद आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालु आहे.
कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि २, डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शंतनु नाईक निंबाळकर, सपोफी, राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोना. अतिक शेख, पोशि रमेश खेडकर व पोना गिलवीले व पोशि लोखंडे यांनी मिळुन केली आहे.















