- भाजपच्या अमित गोरखेंकडून अभिश्रीचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२३) :- श्रीलंका येथे २६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘युथ एशियन योगा गेम्स’ साठी निगडी येथील अभिश्री राजपूत हीची भारतीय संघाची कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय एशियन गेम्सचे सेक्रेटरी सुरेश गांधी यांनी ही निवड केली आहे. या निवडीबद्दल भाजपच्या वतीने अमित गोरखे यांनी नुकताच अभिश्रीचा सन्मान केला.
अभिश्री ही कोया फिटनेस अकॅडमीची संस्थापक असून संघटनेतून पिंपरी चिंचवड शहरातील १३ मुलींची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यात अनुष्का रानडे, आर्या जाधव, कश्र्वी गायकवाड, रुजल जोशी, आरोही राऊत, मनवा पंडित, मुक्ता जाधव, त्रिशा बंसल, ट्विषा सुहानी, सई निंबाळकर, प्रणिका गावंडे, जानवी मुळूक, अनविका वायकर यांचा समावेश आहे. २४ ऑगस्ट रोजी हा संघ एशियन गेम्ससाठी रवाना होईल. या सर्वांना अमित गोरखे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


















