न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी विशाल अनंतराव जाधव यांना पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले.
ओबीसी सेल नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष (ओबीसी सेल) राज राजापुरकर,महिला प्रदेशाध्यक्ष अॅड वंदनाताई चव्हाण, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे,युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिन निंबाळकर, विशाल क्षीरसागर, विशाल शिंदे, शाहिद शेख,अशोक हरपळे पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, सुवर्णा वाळके, कविता देवकर, दिपाली पारखे, मनीषा निंबाळकर उपस्थितीत होते.
ओबीसी समाजाचे असंख्य पाठबळ असल्याने प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी विशाल जाधव यांना पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे अशा भावना ओबीसी समाज बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहेत.












