- देहूरोडमध्ये स्वयंघोषित भाईची दादागिरी; दारूच्या बाटल्या फेकून मारल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- ” मी आता भाई आहे; मी आताच मोक्यामधून सुटून आलो आहे, तु रफिक यास कसा भाई म्हणतो; असे म्हणत आरोपी क्र. १ याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली. ‘रफिकला भाई म्हणतो, तुला आता संपवुन टाकतो’ असे म्हणत आरोपीने फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने टेबलावर असलेली बाटली फिर्यादीच्या डोक्यात उजव्या बाजुला मारली.
त्यानंतर सह आरोपी क्र. २ व इतरांनी मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उदेशाने टेबलावरच्या दारुच्या बाटल्या उचलुन फिर्यादीच्या डोक्यात मारल्या. फिर्यादी खाली पडल्यावर आरोपी क्र. २ ते ५ यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २७) रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास सवाना हॉटेल, सवाना चौक, आधार हॉस्पीटलच्या बाजूला, देहूरोड येथे घडला. फिर्यादी विनोद दत्तात्रय जगताप यांनी आरोपी १) सुरज पवार, २) दत्ता कटारे, ३) साहील राऊत, ४) राज पाटील, ५) केतन चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ४८२/२०२३ भादवी कलम ३०७, १४३, १४७,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सपोनि गज्जेवार पुढील तपास करीत आहेत.












