- चिंचवडच्या जयश्री टॉकीजजवळ एकाला बेल्टने मारहाण करीत रोकड लुटली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- काही कारण नसताना फिर्यादीला आरोपींनी शिवीगाळ केली. हाताने, कमरेच्या पट्टयाने व दगडाने तोंडावर, डोक्यात व पाठीवर मारहाण केली. फिर्यादीला जखमी करुन ‘पोलीस स्टेशनला गेला तर, तुला बघुन घेईल’ अशी धमकी दिली. फिर्यादीच्या पॅन्टच्या खिश्यातील १३०० रुपये रोख जबरदस्तीने काढून नेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २७) रोजी रात्री १०.०० च्या दरम्यान जयश्री टॉकीज, बस स्टॉपजवळ, चिंचवड येथे घडला. फिर्यादी आकाश भाऊसाहेब आमले (रिक्षा ड्रायव्हर) यांनी आरोपी १) श्रीकांत ऊर्फ ज्ञानेश्वर माऊली गालफाडे, २) स्वप्नील बंडु उघडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलीस ठाण्यात ५२८/२०२३ भादंवि कलम ३९४,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोउपनि गिरी गोसावी करीत आहेत.












