न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- पीएमपीकडून दोन्ही शहरांतील नागरिकांसाठी रक्षाबंधन सणानिमित्त १६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. बुधवारी (दि. ३०) रोजी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी बसगाड्यां व्यतिरिक्त जादा ९६ बस अशा एकूण १९३३ बसचा ताफा पीएमपीकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
या बस कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगाव, राजगुरुनगर व देहूगाव इत्यादी ठिकाणांहून सुटतील.
बस स्थानकांवर नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.












