न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२३) :- अवैधरित्या परवाना नसताना आरोपीने बेकायदेशीररित्या गोवा राज्यातुन विदेशी दारू विक्रीस आणली. विदेशी दारूचा साठा आरोपीने जवळ बाळगत त्याची वाहतुक केली.
दरम्यान (दि. २८) रोजी दुपारी ३.५० च्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील जुना पुणे-मुंबई हायवेवरील इंडीयन ऑईल पेट्रॉल पंप येथे कारवाई करून पोलिसांनी ३,७४,२०० रुपये किमतीचा माल जप्त केला.
आरोपी मधुकर मोतीराम शिरसाट याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ४६३/२०२३ म प्रो का क६५ ई. ८३ प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपीला पोलिसांनी सीआरपीसी ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस दिली आहे. पोउपनि शिंपणे पुढील तपास करीत आहेत.












