न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- महापालिका निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची ठाण्याला बदली झाली आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी असलेले बाळासाहेब खांडेकर यांची १४ सप्टेंबर २०१९ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.
तो विभाग कायम ठेवून खांडेकर यांची ठाणे येथे उपमहानियंत्रक नोंदणी व उपनियंत्रक मुद्रांक म्हणून नियुक्ती झाली आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीनंतर शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केले होते.
—












