- पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक अनं महाप्रसादाचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- तिसऱ्या श्रावणी सोमवारी देहुगावातील भीमाशंकर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देहूतील भीमाशंकर शिवलिंग प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने रा.ध.हिंदू संघटनचे पुणे जिल्हाध्यक्ष हंसराज पाटील यांच्या हस्ते पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक करत महापुजा करुन आरती करण्यात आली. त्यांनतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
तिसर्या सोमवारी देखील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक देहू आणि लगतच्या परिसरातून येत होते. सकाळपासूनच भाविकांची दर्शनसाठी मोठी रीघ लागली होती. आरतीनंतर सुमधुर असा शंखनाद करण्यात आला. यामुळे संपूर्ण देहूगाव व परिसर दुमदुमुण गेला होता, अशी माहिती भीमाशंकर शिवलिंग प्रतिष्ठान मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.
प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने हंसराज पाटील, प्रीतम वारघडे, बापूसाहेब काळोखे, अमित गाडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक अक्षय शिंगाडे, हिंदू संघटनेचे राहुल मिश्रा, दीपक चव्हाण, शंकर मानकर, सचिन शिंदे, श्रीरंग घागरे, अरविंद वाघीले, भीमाशंकर शिवलिंग प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार भीमाशंकर शिवलिंग प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष नामदेव शिंगाडे यांनी केले.