न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माजी नगरसेवक साहेबराव खरात यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते साहेबराव खरात यांच्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी बालगोपाल विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक कैलास कुदळे सामाजिक कार्यकर्ते अतुल घुले , मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते.
बुद्धांनी दिलेले ज्ञान स्वतः अंगीकारून बुद्धांच्या शिलाचे आचरण केले तसेच या पिंपरी चिंचवड शहरात अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून धम्मक्रांती केली. “साधी रहाणी व उच्च विचारसरणी असणारे ‘साहेबराव ‘ सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात आपल्या क्षेत्राचा चांगला ठसा उमटवला होता. माणसावर माणूस म्हणून प्रेम करणारे, अन्यायाच्या विरुद्ध झगडणारे, वंचिताचे दुःख पाहून अश्रू ढाळणारे दिनदुबळ्याचे कैवारी समाजाच्या उन्नतीसाठी धडपडणारे कोरोनाच्या काळामध्ये ते काळआड गेले. त्यामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल ची स्थापना केली, असे मत संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी मांडले.
सूत्रसंचालन बबीता पाटील यानी केले व उर्मिला ठोंबरे आभार व्यक्त केले.















