- प्रवाशांचा २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :-पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पीएमपीने शहरातील तब्बल २०० मार्गांवर विना थांबा विनावाहक बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कोणत्या मार्गांवर बस सेवा चालवली पाहिजे याचे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे.
येत्या काही दिवसात या सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेल्या मार्गावर बस सेवा चालवली जाणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. या बस सेवेमुळे प्रवाशांचा २० ते २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे, असा दावा केला जात आहे.
ही सेवा येत्या महिन्याभरात प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे. सध्या चार मार्गावर ही सेवा सुरू असून २०० मार्गांवर ही सेवा विस्तारण्याचे काम पीएमपीने हाती घेतले आहे. आतापर्यंत २० मार्गांची निवड झाली असून आगामी काही दिवसात इतरही मार्गांची निवड होणार आहे. या विनाथांबा, विनावाह बससेवेअंतर्गत बस सुटण्यापूर्वीच चालक प्रवाशांना तिकीट देणार आहे.