- आमदार सुनील शेळकेंकडून बदलीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२३) :- तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांची बदली करण्याची मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्राद्वारे नगरविकास विभागाकडे केली आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर एन. के. पाटील हे सध्या कार्यरत असून, पाटील यांच्याबद्दल माझ्याकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तळेगाव दाभाडे शहराची लोकसंख्या सुमारे ८० हजार इतकी असून, सद्य:स्थितीत नगर परिषद हद्दीमध्ये वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पाणीपुरवठा तसेच मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य व्यवस्था व स्वच्छतेच्या तक्रारी घेऊन नागरिक नगरपालिकेत आल्यावरही पाटील यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या तुलनेत पाटील यांची कामाची पद्धत असमाधानकारक आहे. त्यामुळे बदली करावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.













