न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाने प्रभाग क्र.०२ मधील बो-हाडेवाडी, मोशी परिसरातील सुमारे ३००० चौ.फ़ुट क्षेत्रातील पत्राशेडवर (दि. १५) रोजी अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उप.अभियंता सुर्यकांत मोहिते, यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पाटील,प्रियांका म्हस्के, रचना दळवी व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.
प्रभाग क्र.०२ मधील बो-हाडेवाडी, मोशी परिसरातील ३००० चौ.फ़ुट पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची तसेच अनाधिकृत बॅनर्स काढ़ण्यात आले. या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी रस्त्यावर बेवारस वाहने उभी करुन नये तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड व बॅनर्स उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या.