न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- यावर्षी १९ सप्टेंबर रोजी भद्रा व वैधृति योग असला, तरी श्रीगणेशाची स्थापना ब्राह्ममुहूर्त ते मध्यान्हापर्यंत म्हणजेच पहाटे ४:५० पासून ते दुपारी १:५० वाजेपर्यंत अंगारक योगावर करता येईल, असे सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी सांगितले.
येत्या १९ सप्टेंबरपासून पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. प्रात: कालापासून ते मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टीकरण आदी वर्ज्य नाहीत. त्यामुळे यावर्षी १९ सप्टेंबर रोजी भद्रा व वैधृति योग असल्याने गणेशाची स्थापना कधी करावी, असा संभ्रम आहे.
गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस :- १९ सप्टेंबर : श्रीगणेश चतुर्थी, २१ सप्टेंबर : गौरी आवाहन, २२ सप्टेंबर गौरी पूजन, २३ सप्टेंबर गौरी विसर्जन, २८ सप्टेंबर अनंत चतुर्दशी..