- पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तात्पुरता अलर्ट आदेश जारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणपती विसर्जनाकरीता ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका देखील मोठ्यासंख्येने निघत असतात. मिरवणुका या रस्त्यावर आल्याने मिरवणुक पाहण्याकरीता नागरीकांची रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेने गर्दी होवुन वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांचे अनेक मानवी तास वाया जात असतात.
या कालावधीत शहरातील वाहतुकीचे दळणवळणदेखील उत्तम प्रकारे होणे गरजेचे असल्याने उत्सवाच्या कालावधीत वाहतूक बदल करून वाहतूक गतिमान करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर वाहतुक शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी तात्पुरत्या स्वरुपात शहरातील वाहतूकीत बदल केले आहेत.
भोसरी वाहतुक विभाग :-
१. फुगेवाडी दापोडी ओव्हर ब्रिज मार्ग शितळादेवी चौकाकडुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूकीस (दि.२३ ते दि.२५ ते दि. २८) पर्यत गणपती विसर्जनाच्या अनुषांगाने दुपारी २.०० ते रात्री ११.०० वा. पर्यंत प्रवेश बंदी करण्यात येत आहे.. पर्यायी मार्ग:- १. सदरची वाहने शितळादेवी चौकातुन उजवीकडे वळुन सांगवी मार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग : २. सदरची वाहने फुगेवाडी चौकातुन हॅरीप ब्रिजचे अंडरपासने बोपोडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
तळेगाव / महाळुंगे वाहतूक विभाग :-
२. म्हाळुंगे वाहतूक विभागाच्या हद्दीतील एच.पी चौक येथून तळेगाव-चाकण रोडवर येणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग : १. सदर मार्गावरील वाहतूक एच.पी. चौक आंबेठाण चौक चाकण-शिंदे वासुली नवलाख उब्रे- तळेगाव एमआयडीसी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाईल
२. सदर मार्गावरील वाहतूक एच.पी चौक भामचंद्र डोंगर मार्गे बदलवाडी- नवलाख उंबरे तळेगाव एमआयडीसी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाईल
३. मुंबईकडुन येणाऱ्या जड़ अवजड वाहनांना वडगाव फाटा पुणे ग्रामीण हद्दीतून चाकण- नाशिककडे जाण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :-१. सदर मार्गावरील वाहतूक तळेगाव एमआयडीसी- नवलाख उंबरे- आंबेठाण चौक- शिंदे वासुली मार्गे इच्छितस्थळी जाईल
२. सदर मार्गावरील वाहतूक वडगाव फाटा- सोमाटणे फाटा सेंट्रल चौक भक्ती शक्ती त्रिवेणीनगर मार्गे इच्छित स्थळी जाईल (दि. २५ दुपारी ४.०० ते दि. २६ रोजी पहाटे २.० वाजेपर्यंत) वरीलप्रमाणे तळेगाव महाळुंगे वाहतूक विभागाच्या हद्दीत तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल करण्यात आले असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
सांगवी वाहतूक विभाग…
४. कृष्णा चौकाकडुन फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सदर मार्गावरील वाहतूक पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिज कडुन इच्छितस्थळी जातील. ५. माहेश्वरी चौकाकडुन माकण हॉस्पीटल चौक जुनी सांगवी कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहतूक बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवी मार्गे औध किंवा पाण्याची जुनी टाकी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिज कडुन इच्छितस्थळी जातील.
६. कृष्णा चौकाकडुन साई चौक ते माहेश्वरी चौक कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग : सदर मार्गावरील वाहतूक काटे पुरम चौकातून डावीकडे वळून मयुरनगरी -एम के हॉटेल उजवीकडे वळुन ढोरे फार्म बारा घोलप महात्मा फुले ब्रिज मार्गे इच्छितस्थळी जातील.
७. कृष्णा चौकाकडुन क्रांती चौक / फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहतूक काटे पुरम चौकातून डावीकडे वळून मयुरनगरी एम के हॉटेल उजवीकडे वळुन ढोरे फार्म वारा घोलप महात्मा फुले ब्रिज मार्गे इच्छितस्थळी जातील.
८ कृष्णा चौकाकडुन साई चौकाकडे जाणाऱ्या वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. :
पर्यायी मार्ग:- सदर मार्गावरील वाहतूक काटे पुरम चौकातून डावीकडे वळून मयुरनगरी एम के हॉटेल उजवीकडे वळुन ढोरे फार्म बारा घोलप महात्मा फुले ब्रिज मार्गे इच्छितस्थळी जातील.
९. साई चौक तसेच कृष्णा चौकाकडुन जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- सदर मार्गावरील वाहतूक वा. रा. घोलप ढोरे फार्म एमके हॉटेल मयुरनगरी काटे पुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
१०. पाण्यांची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक तसेच शितोळे पेट्रोल पंपाकडे जाणान्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदर मार्गावरील वाहतूक साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलीस चौकीजवळूनसाई चाकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलीस चौकीजवळून महात्मा फुले ब्रिज कडून औध मार्गे इच्छितस्थळी जातील. तरी (दि. २५ रोजी दुपारी ४.०० ते रात्री १२.०० वाजेपावेतो वरीलप्रमाणे सांगवी वाहतूक विभागाचे हद्दीत तात्पुरते स्वरुपात व आवश्यकतेनुसार वाहतूक बदल करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
वाकड वाहतूक विभाग
११. साठे चौक येथून दत्त मंदिर रोडला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग : दत्तमंदिर रोडने जाणारे वाहन चालक डावीकडे कावेरीनगर किंवा उजवीकडे काळाखडक चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
१२. वाकड़ चौकाकडुन दत्तमंदिर रोडला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहतूक वाकड चौकातुन पुढे कस्पटे कॉर्नर मार्ग इच्छितस्थळी जाईल. १३. उत्कर्ष चौकाकडुन दत्तमंदिर रोड वाकड येथे येणाऱ्या वाहनांना म्हातोबा चौक येथून प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहतूक करपर्ट कॉर्नर येथून इच्छित स्थळी जाईल
१४. पोलारीस हॉस्पीटल चौक दत्तमंदिर रोड तसेच सम्राट चौक दत्तमंदिर रोड येथील वाहतूक गरजेनुसार वळविण्यात येईल दिनांक (२८ रोजी दुपारी ४.०० ते रात्री १२.००) वाजेपावेतो वरीलप्रमाणे चाकड वाहतूक विभागाचे हद्दीत तात्पुरते स्वरुपात वाहतूक बदल करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
चिंचवड वाहतूक विभाग
१५. अहिंसा चौक ते चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी पर्यायी मार्ग :- एसकेएफ चौकातुन खंडोबामाळकडुन मुंबई पुणे हायवेरोडने इच्छित स्थळी जातील. १६. दळवीनगर ब्रिज कडुन चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग- एसकेएफ चौकाकडुन बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील. १७. वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडुन चाफेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग:- वाल्हेकरवाडी जुना जकातनाका डावीकडे वळुन जैन शाळेपासुन बिजलीनगर अथवा एस के एफ मार्गे खंडोबामाळ मार्गे इच्छितस्थळी जातील. १८. लिंकरोडवरुन चाफेकर चौकातील पीएमटी बसस्टॉप येथुन चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे
पर्यायी मार्ग :- लिंकरोडने येणारे वाहन चालकांनी डावीकडे वळुन काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील
१९. भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथुन चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- केशवनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
२०. चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्हयु चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग :- चिंचवडे फार्म वाल्हेकरवाडी लंडनब्रिज रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.
२१. अहिंसा चौक व रिव्हर व्हयु चौकाकडुन चाफेकर उड्डानपुलावरुन येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- रिव्हर व्हयु चौक कडुन वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंसा चौक ते महावीर -चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. दि. २८/०९/२०२३ रोजी दुपारी ३/०० ते ००/०० वा पर्यंत अथवा वाहतुक सुरळित होईपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडुन) सर्व प्रकारचे वाहनांकरीता तात्पुरते स्वरुपात बंद करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
हिंजवडी वाहतूक विभाग
२२. टाटा टी जंक्शन चौक टाटा टी जंक्शन चौकाकडुन जॉमेट्रीक सर्कल व शिवाजी वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- टाटा टी जंक्शन चौकाकडुन लक्ष्मी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.
२३. जॉन्ट्रीक सर्कल चौक- जॉमेट्रीक सर्कल चौकाकडुन मेझा ९ व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग जॉमेट्रीक सर्कल चौकाकडुन मेझा व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतुक टाटा टी जंक्शन चौकाकडे जावुन लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. २४. मेझा ९ चौक मेझा ९ चौकाडुन शिवाजी चौकाकडे वाहतुक जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग मेझा ९ चौकाकडुन शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतुक लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. २५. शिवाजी चौक- शिवाजी चौकाकडुन हिंजवडी गावठाण कडे जाणारे वाहतूकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहतूक शिवाजी चौक- विप्रो सर्कल फेज ०१ चौक, जॉमेट्रीक टाटा टी जंक्शन चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२६. कस्तुरी चौक- कस्तुरी चौकाकडुन शिवाजी चौक हिंजवडीकडे वाहने जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – कस्तुरी चौकाकडुन शिवाजी चौक हिंजवडीकडे जाणारी वाहतुक विनोदे वस्ती कॉर्नर, – लक्ष्मी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२७. जांभुळकर जीम चौक शिवाजी चौक व ताडीवाला रोड कडे वाहने जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग :- शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाणारी वाहने इंडियन ऑईल चौक, कस्तुरीचौक पुढे विनोदे वस्ती कॉर्नर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२८. इंडियन ऑईल चौक- जांभुळकर जीम चौक व शिवाजी चौकाकडे वाहने जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग :- जांभुळकर जीम चौक व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहने कस्तुरीचौक पुढे विनोदे वस्ती कॉर्नर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तरी वरील प्रमाणे दिनांक २५/०९/२०२३ २७/०९/२०२३ २८/०९/२३ रोजी १६.०० ते २४.०० वा पर्यंत हिंजवडी वाहतूक विभागाचे हद्दीत तात्पुरते स्वरुपात व आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
पिंपरी वाहतूक विभाग
२९. पिंपरी चौकातुन शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १ :- पिंपरी पुलावरुन उजवीकडे वळुन भाटनगर मार्गे इच्छित स्थळी जातील पर्यायी मार्ग २ :- मोरवाडी मार्गे एम्पायर इंस्टेट चे मदर टेरेसा ब्रिजवरुन काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील ३०. काळेवाडी पुलावरुन येणारी वाहने डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग :- काळेवाडी पुलावरुन उजवी कडे वळुन जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे हायवे मार्गे इच्छित स्थळी जातील.
३१. पिंपरी चौकातुन गोकुळ हॉटेलकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : पिंपरी चौकाकडुन पिंपरी सर्व्हिस रोडने क्रोमा शोरुम समोरुन इच्छित स्थळी जातील. तरी २३/०९/२०२३, २५/०९/२०२३, २८/१०/२०२३ रोजी दुपारी २.०० ते रात्री ११.०० वा. पर्यंत वरील प्रमाणे पिंपरी वाहतूक विभागाचे हद्दीतील वाहतुक तात्पुरते स्वरुपात वळविण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.