न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 सप्टेंबर 2023) :- पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात आजपासून ५ दिवस २३ ते २७ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाउस कोसळतो आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातही गेल्या दोन दिवसापासून पाउस पडतो आहे. शहरात आजपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
आजपासून येत्या बुधवार पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.