न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२३) :- चिंचवडगावातील केशवनगर येथील ओरिएंटल मार्व्हल सोसायटी तर्फे गणेशोत्सव निमित्त रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरघोस प्रतिसाद देऊन १०१ बॅगचे रक्त संकलन झाले.
गणेशोत्सवानिमित्त आजपर्यंतच्या झालेल्या रक्तदानाच्या जास्तीच्या बाटल्यांचे रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य झाले. वायसीएम रक्तपेढीचे डॉ. मुसर्गी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग ८ वे वर्षे आहे. या शिबिरात अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक व युवतींनी देखील विशेषत: रक्तदान केले.
यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी, सचिव साकेत भलगट, खजिनदार चंद्रशेखर शिरसागर, संतोष पाटील, सुनिल कांदळकर, अभिजीत बाबर, वरून कुलकर्णी, सुभाष जोशी, अभिजीत मांगले, हेमंत देशमुख, मनोज सग्रि, शाम कापरे, राजन पाटील, ज्ञानेश्वरी ओव्हाळ, मधुरा बिडवे, मारुती पाटील, योगेश लंके, अमित भिसे, अशोकानंद घाडगे, प्रशांत पाटील, प्रमोद चौगुले व सोसायटीमधील सदस्य तसेच ओम निसर्ग मंडळ यांचे सहकार्य लाभले.















