न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२३) :- कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मराठवाडा जन विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
दरम्यान खेड तालुक्यातील वेताळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयात जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना देशी व फळांची शंभर वृक्ष भेट देऊन झाडे लावा;झाडे जगवा, देश वाचवा;मनुष्य जीवसृष्टी वाचवा, प्राणी मात्र वाचवा, असा संदेश देण्यात आला.
अरुण पवार म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणासोबतच स्वावलंबनाचे बाळकडू देऊन युवा वर्गामध्ये स्वाभिमान व आत्मविश्वास निर्माण केला. आशिया खंडातील सर्वात मोठ्या आदर्श शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाड्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत पोहचवली.