न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२३) :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रिक्षा चालकाला वाचविताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दुभाजकाला धडकली. सुदैवाने यामध्ये एकही प्रवासी जखमी झाला नाही.
ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सेंट मदर तेरेसा उड्डाणपूलाखाली घडली. बोरिवली ते पुणे ही बस महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने जात होती. चिंचवड येथून जात असताना एका रिक्षा चालकाने अरुंद जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कोणताही अपघात होऊ नये, तसेच रिक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी बस चालक तानाजी सरवदे यांनी बस डिव्हाइडरकडे वळवली.













