- सोसायटीतील विसर्जन मिरवणूक पाहत असताना घडली दुर्घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मोशी बोऱ्हाडेवाडी येथील मंत्रा सोसायटीमध्ये गुरुवारी (दि. २९) रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला.
कु. अर्णव आशिष पाटील असे मुलाचे नाव आहे. अर्णव हा अर्धवट झाकण असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर उभा राहून सोसायटीमध्ये विसर्जन मिरवणूक पाहत होता. त्यावेळी तो टाकीत पडला आणि दुर्घटना घडली.
सीसीटीव्ही द्वारे घटनेचा उलगडा झाला. या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विसर्जन मिरवणुकीत आरवच्या आईने काढलेली सेल्फी अखेरची ठरली.












