- विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्ट निर्णय देणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 30 सप्टेंबर 2023) :- शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या सुनावणीचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं आहे. त्याविरोधात आता ठाकरे गटातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार होती परंतु आता पुढची तारीख 6 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदारांवरील सुनावणीसंदर्भात वेळापत्रक जाहीर केला असून १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे. यातच सर्व याचिका एकत्र करायचा की नाही यावर १३ तारखेला सुनावणी होणार आहे. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार आहे. तसेच २० ऑक्टोंबरला सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाणार आहे. दोन्ही गटातील आपलं म्हणणं मांडल्यानंतर २७ ऑक्टोंबर तारिख ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही गट आपापले मुद्देसुद मांडणी ६ नोव्हेंबरला करतील आणि दावे प्रतिदावे करतील. त्यानंतर १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुदद्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार आहे. तर २० ऑक्टोंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर २३ ऑक्टोंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. सर्व पुरावे तापसल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर आक्षेप घेतला अन् सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 3 ऑक्टोबरला नाही आता पुढची तारीख 6 ऑक्टोबर असून याचिका सुनावणीस येणार का ? याची उत्सुकता अध्यक्षांनी जाहीर केलेलं वेळापत्रक सुप्रीम कोर्ट मान्य करतं का ? याचे उत्तर पुढच्या सुनावणीत मिळणार आहे. त्यामुळे ती कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.















