न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२३) :- दापोडीतील गणेश हेरिटेज सहकारी गृहरचना संस्था मर्या. या संस्थेचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन फिर्यादी काम करतात. ते काम करीत असताना संस्थेमध्ये राहणारी परंतु, संस्थेत सभासद नसणाऱ्या महिला आरोपीने वेळोवेळी फिर्यादीसोबत मोठमोठयाने, आरेरावी अर्वाच्च भाषेत बोलुन व आडदांडपणाचे वर्तन केले. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून महिला संस्थेची सभासद नसताना स्वतःकडे अनाधिकारपणे ऑफिसची व स्टोअर रूमची चावी ठेवली.
स्त्रीपणाचा फायदा घेवुन फिर्यादीला ‘आमच्या संस्थेत नाक खुपसु नको, मी चाव्या देणार नाही. नाहीतर तुझ्यावर विनभंगाची तसेच अॅट्रोसिटीचा गुन्हे दाखल करील” अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी संस्थेकडे जात असताना आरोपीने गाडी आडवी लावुन फिर्यादीला संस्थेत जाण्यास प्रतिबंध केला.
”तु कसा राहतो तुला चिरडुन टाकील” अशी धमकी देवुन फिर्यादीला मोठमोठयाने एकेरी भाषेत बोलु लागली. त्यांनतर फिर्यादी ऑफिसमध्ये गेले असता फिर्यादी यांच्या मागे ऑफिसममध्ये येवुन त्यांच्यासोबत मोठमोठयाने एकेरी भाषेत बोलुण तसेच ऑफिसमधुन निघुन जाताना अशील शब्द उचारत ‘तु कसा राहतो ते बघते’, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि.१७/७/२०२३ ते दि. ०१/१०/२०२३) दरम्यान गणेश हेरिटेज सहकारी गृहरचना संस्था मर्या, दापोडी येथे घडला.
फिर्यादी बाळकृष्ण शिवनाथ घुगे यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. भोसरी पोलिसांनी महिलेच्या विरोधात ७८०/२०२३भा.द.वि कलम ३५३,३४१,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जोनापल्ले पुढील तपास करीत आहेत.