न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२३) :- श्रध्दा कन्स्ट्रक्शन ॲन्ड पावर जनरेशन प्रा. लि. कंपनी (सध्या श्रध्दा एनर्जी ॲन्ड इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि.) या कंपनीच्या नावे खेड तालुक्यातील खराबवाडी येथील जमीन गट नंबर ३५७ मधील १ हेक्टर ६० आर क्षेत्र आरोपी क्रमांक १ ते ५ यांचे नातेवाईक भिका नाना लोढे यांच्याकडुन खरेदी केली. हे माहिती असतानासुध्दा आरोपी क्र १ ते ५ यांनी आरोपी क्र ६ ते ८ यांच्या सोबत संगणमत करुन स्वतःचे नाव जागेच्या सात / बारा सदरी शासकीय यंत्रणेची दिशाभुल करुन लावुन घेतले. त्याच्या आधारे सदरची जमीन आरोपी क्र ६ ते ८ यांना विक्री केली. त्यानंतर आरोपी क्र ९ याने इतर आरोपींना सोबत घेवुन जे.सी.बी. व टॅक्टरसह सदर जागेमध्ये अनाधिकृपणे प्रवेश करुन सदर जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.०५/०४/२०२३ ते दि २९/०९/२०२३) रोजी दरम्यान घडला. फिर्यादी अजय शिवाजीराव जाधव यांनी आरोपी १) पार्वतीबाई शंकर राशे, २) इंदुबाई बाळु वैरागर, ३) सिमा अशोक तांबे, ४) रोहिनी ज्ञानेश्वर गायकवाड, ५) राहुल हनुमंत शेलार, ६) भरत एकनाथ कानपिळे, ७) पंकज भरत कानपिळे, ८) प्रशांत भरत कानपिळे, ९) चंद्रकांत राशे (पुर्ण नाव माहिती नाही.), इतर साथीदारांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
त्यावरून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलिसांनी ५८७ / २०२३, भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४७१, ४४७, १४३, १४९ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गोसावी पुढील तपास करीत आहेत.













