न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- ग्रामीण भागात बालपण व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या सोनाली झोळ इजिप्त येथे होत असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेच्या ‘COP28 सिम्युलेशन मॉडेल’ परिषदेसाठी भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व करत आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि हवामान कृतीसाठी आर्थिक संसाधने एकत्रित करणे यासह हवामान बदलाच्या तातडीच्या आव्हानांना तोंड देणे याविषयी इजिप्त येथे होत असलेल्या अरब स्टेटच्या पर्यावरण बदल परिषदेत पिंपरी चिंचवडच्या सोनालीचे भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व ही अभिमानास्पद आहे.
गतवर्षीच्या COP27 चेही सोनाली झोळ ने प्रतिनिधित्व केले होते. यासाठी तीला पिंपरी चिंचवड मधील ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ चे डायरेक्टर प्रा.भूषण ओझर्डे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
वडिलांच्या नोकरीमुळे तीचे बालपण व शालेय शिक्षण ग्रामीण भागातच झाले. अमरावती विद्यापीठाच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करत तीने आकुर्डी पुणे येथील डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून संगणक अभियांत्रिकी (M.E) मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान तीने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. तिथेच तीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO), युनायटेड नेशन्स सोबत कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच सभोवताली दिसणारी परिस्थिती, माध्यमांमधून येणाऱ्या प्रदूषण, हवामान बदलांच्या बातम्या सातत्याने कानावर पडल्यामुळेच, सोनाली पर्यावरणाबद्दल संवेदनशील झाली.
तीने इस्रो संस्थेमधून सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण केलेला आहे. UNICEF मधील अन्न आणि कृषी संस्थेसाठी तीने कार्य केले आहे. जी 20 परिषदेसाठी भारताची प्र्तिनिधी म्हणून तिची निवड झाली होती. युनायटेड नेशनच्या विविध परिषदा आणि शिखर परिषदेसाठी तीची निवड झालेली आहे. युनायटेड नेशन्सच्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्ससाठी निवडली गेली आणि युनाइटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज ची एक युवा मतदारसंघाची सदस्य झाली. युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचा सदस्यही झाली आणि या परिषदेसाठी निवड झाली आहे.