- पुण्यासह महाराष्ट्रातून सुमारे १५००० स्वयंसेवकांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे निरंकारी मिशनचा ७६ वा वार्षिक निरंकारी संत समागम, गेल्या ७५ वर्षांप्रमाणे याही वर्षी २८,२९ आणि ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पूर्व तयारीसाठी पुण्यासह महाराष्ट्रातून मागील दोन महिन्यांपासून तुकड्या-तुकड्यांनी निरंकारी सेवादल स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण नियमितपणे समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीच्या कार्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये पुण्याहून सुमारे १००० तर उर्वरित महाराष्ट्रातून सुमारे १४००० स्वयंसेवकांचा समावेश आहे.
समागमासाठी येणाऱ्या संतांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी तंबू उभारणे यासारखे अनेक सेवाकार्य सेवादारांकडून मोठ्या उत्साहाने सुरू आहेत. समागम स्थळावर मुख्य सत्संग पंडाल च्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. ७६ व्या वार्षिक निरंकारी संत समागमात संपूर्ण भारत तथा देश विदेशातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. निरंकारी सेवादलाचे बंधू आणि भगिनी निळा आणि खाकी गणवेश परिधान करून, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विमानतळावर येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करताना आणि त्यांना त्यांच्या पूर्वनिश्चित निवासस्थानी नेण्याची व्यवस्था करताना दिसतील.













