न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने पिंपळे सौदागरमध्ये शुक्रवार (दि. २०) ते रविवार (दि. २२ ऑक्टोबर) या दरम्यान ‘ भव्य दांडिया आणि रास गरबा ‘ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या मैदानात त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उद्योजक संदीपशेठ काटे आणि कलाकारांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तीन दिवसीय या महोत्सवात दररोज विविध प्रकारचे बक्षीसे लुटण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.
आयोजक अनिताताई काटे यांनी पिंपळे सौदागर मधील सोसायटीतील नागरिकांसाठी नवरात्रीनिमित्त सलग तीन दिवस ‘ भव्य दांडिया महोत्सव ‘ आयोजित केला आहे. त्यात गुजराती पारंपरिक गरबा व लोकगीते यांच्यासोबत आधुनिक साऊंड ट्रॅकवर बसवलेले दांडिया नृत्य, सोबतच प्रख्यात गायकांच्या गायनावर तरुणाई थिरकणार आहे. सहभागी प्रत्येकाला बक्षीस जिंकण्याची संधी आहे. त्यात उत्कृष्ठ कपल, उत्कृष्ठ नृत्य (पुरुष), उत्कृष्ठ नृत्य (महिला), उत्कृष्ठ वेशभूषा (पुरुष), उत्कृष्ठ वेशभूषा (महिला), उत्कृष्ठ बाल नृत्य (मुलगा), उत्कृष्ठ बाल नृत्य (मुलगी), उत्कृष्ठ बाल वेशभूषा (मुलगा / मुलगी) यांच्यातील सर्वोत्कृष्ठ स्पर्धकाची बक्षीसासाठी निवड करण्यात येणार आहे. सोसायटी वर्गाने या दांडिया महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.